शिक्षक पत्नीला विद्यार्थ्यांने केला फोन आणि प्राचार्यांची सटकली

धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगांव इथली. गोकुळ शिरगांव इथल्या आंबुबाई पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल अॅन्ड सायन्स कॉलेजच्या प्राचार्यानी बाराबीत शिकाणाऱ्या विदयार्थाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शिक्षक पत्नीला फोन करण्याच्या कारणावरून ही मारहाण केल्याचे सांगितलं जात आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 26, 2013, 09:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगांव इथली. गोकुळ शिरगांव इथल्या आंबुबाई पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल अॅन्ड सायन्स कॉलेजच्या प्राचार्यानी बाराबीत शिकाणाऱ्या विदयार्थाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शिक्षक पत्नीला फोन करण्याच्या कारणावरून ही मारहाण केल्याचे सांगितलं जात आहे.
शिक्षिका असलेल्या पत्नीला वारंवार फोन का करतोस, असं म्हणत कॉलेजचे प्राचार्य के.डी.पाटील यांनी सुशांत रणनवरे या विद्यार्थांला कॉलेजमध्ये कोंडून मारहाण केलीय. या मारहाणीत जखमी झालेल्या सुशांत रणनवरे यांच्यावर कोल्हापुरातील सी.पी.आर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्राचार्यांना अटक करण्यात आलेय.
प्राचार्य पाटील यांनी ही जबर मारहाण केल्याचं उघडकीस आलय. शिक्षक पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं कोल्हापूर जिल्हयातून संताप व्यक्त होतोय. सुशांत रणनवरे हा बारावीत शिकणारा विद्यार्थी. मंगळवारी सायंकाळी कॉलेजचे प्राचार्य पाटील यांनी सुशांतला रुमवरुन जबरदस्तीनं घेवून कॉलेजच्या स्टाफरुमध्ये घेवून गेलेत. तिथे रुमला कडी लावून सोबत आणलेल्या काठीनं सुशांतला काही कळण्याआगोदर बेदम मारहाण करण्याला सुरूवात केली. या मरहाणीत सुशांत गंभीर जखमी झाला.
सुशांतनं प्राचार्यांना या मारहाणीचं कारण विचारल्यानंतर तू माझ्या शिक्षक असलेल्या बायकोला सारखा फोन करतोस म्हणून आपण मारहाण केल्याचं सांगितलं. प्राचार्य पाटील यांनी केलेल्या मारहाणीत सुशांतच्या डोक्याला, पाठीला, पायावर आणि हाताच्या बोटावर गंभीर दुखापत झालीय.
सुशांतवर कोल्हापूरातील सी.पी.आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे प्रकरण घडल्यानंतर प्राचार्य के.डी.पाटील यांनी सुशांतच्या नातेवाईकांना फोन करुन हे प्रकरण दडपण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. दरम्यान या प्रकरणाची झी चोवीस तासनं दखल घेतल्यानंतर पोलीस प्रशासनानं सुशांतच्या तक्रारीवरु प्राचार्य पाटील यांच्याविरोधात अपहरण करुन मारहान केल्याचा गुन्हा दाखल केलाय.
कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता बेदम मारहाण केली. एवढचं नव्हे तर झी २४ तासची टीम प्राचार्याचं चित्रिकरण करण्यासाठी गेल्यानंतर उद्धट वर्तनाचा कळस गाठत आणखी पोझ देवू का, असंही म्हटलं. यावरुनच प्राचार्य पाटील हे किती मुजोर झालेत हे स्पष्ट होतोय. एकीकडं शिक्षकांना समाजात आदर्श स्तान असताना दुसरीकडं पाटीलांसारखे प्राचार्य या पदाला काळीमा फासण्याचा प्रयत्न करतायेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.