www.24taas.com, झी मीडिया, जयसिंगपूर
यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.
जयसिंगपूरमधल्या ऊस परिषदेमध्ये ते बोलत होते. राज्यातल्या सहकारी कारखान्याच्या विक्रीची तातडीनं सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात साखरेचे भाव प़डतात आणि त्यानंतर पुन्हा यामध्ये वाढ होते,यामागे काय कारस्थान आहे, असा सवालही त्यांनी विचारला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात साखरेचे भाव प़डतात आणि त्यानंतर पुन्हा यामध्ये वाढ होते,यामागे काय कारस्थान आहे, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारलाय. शरद पवारांच्या आकड्यांच्या घोळामुळे साखर निर्यात करता आली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सत्तारुढ आघाडीचे नेते आणि कारखानदार एक झाल्यानंच ऊसदाराबाबत शेतक-यांना लढावं लागतंय. असा आरोप शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केलाय. साखर कारखाने बंद ठेवून ऊस वाळविण्याचा प्रयत्न केल्यास वाळलेल्या ऊसाची नुकसान भरपाई छातीवर बसून काढून घेऊ असा इशारा त्यांनी दिला. जयसिंगपूरच्या या परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ