राजकारण्यांना नक्षलवादी बनून गोळ्या घाला- परेश रावल

एक दर्जेदार अभिनेता अशी ख्याती मिळवलेले परेश रावल यांच्या सहनशीलतेचा आज अंत झाला. आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

Updated: Nov 6, 2012, 12:23 PM IST

www.24taas.com, पुणे
एक दर्जेदार अभिनेता अशी ख्याती मिळवलेले परेश रावल यांच्या सहनशीलतेचा आज अंत झाला. आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. `सध्याचे राजकारणी घटिया असून त्यांना नक्षलवादी बनून गोळ्या घालाव्यात.` असा हल्लाबोल अभिनेता परेश रावल यांनी केला आहे.
पुण्यात आयोजित पुलोत्सवात त्यांनी राजकारण्यांवर परेश रावल यांनी आसूड ओढलेत.. सध्याचे राजकारण आणि राजकारण्यांना पाहून रक्त उसळून येतं अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केलीय.. शिवाय राजकारण्यांना कशाचीही बांधिलकी राहिली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. या कठीण परिस्थितीमुळं गरीबांना जगणं कठीण झाल्याचंही त्यांनी सांगितलंय..
तसंच सारेच भ्रष्टाचारावर बोलतात, मग भ्रष्टाचार करतंय तरी कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.. पु.ल.स्मृती पुरस्कार देऊन परेश रावल यांचा गौरव करण्यात आला.. त्यावेळी ते बोलत होते..