www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळं मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झालेत.
पूर्वीच्या पद्धतीनुसार समितीला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ही रक्कम जवळपास चौपट आहे. पहाटे मंदिर उघडल्यापासून रात्री बंद करेपर्यंतच्या काळात कुठल्या बडवे आणि उत्पातांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी शेजारी उभं राहून देवाच्या पायाजवळ भाविकांकडून ठेवली जाणारी दक्षिणा गोळा करायची आणि त्यानंतर लिलाव करण्याची याठिकाणी वर्षानुवर्षे पद्धत होती.
दररोज संध्याकाळी मंदिरात हे लिलाव होत असत. बडवे आणि उत्पात मंडळींनाच त्यात भाग घेता येत असे. आणि ही मंडळी गर्दीचे दिवस लक्षात घेऊन आपापसात मिळून ही लिलावाची रक्कम बोलत असत. मात्र सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर हा लिलाव बंद करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.