www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापुर
दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऊस आंदोलनात जखमी झालेल्या कान्स्टेबलच्या मृत्यूप्रकरणी स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
दोन वर्षांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हिंसक आंदोलनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन पवार हे जखमी झाले होते. त्यांचा गेल्या रविवारी मृत्यू झालाय. २०१२ मध्ये पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोलीजवळ स्वाभिमानी शेतकरी पक्षानं आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. यावेळी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली होती. त्यात मोहन पवार जखमी झाले होते. पवार यांच्या मृत्यूनंतर राजू शेट्टी यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानं त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मात्र, आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं हे राजकीय कट-कारस्थान असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.