www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
काहीही झालं तरी आयआरबी कंपनीला टोल देणार नाही, असा निर्धार करत राज्य सरकारला अखेरचा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज कोल्हापूरकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत. सकाळी अकरा वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोल विरोधकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय.
हे आंदोलन जेष्ठ नेते प्रा. डॉ. ए. डी. पाटील, छत्रपती शाहु महाराज, जेष्ठ विचारवंत कॉम्रेड गोवींद पानसरे, खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होतंय. या ठिय्या आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरीकांसह विवीध पक्ष, सामाजिक संघटना, शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. राजकीय पक्ष, संघटना शासनाच्या आणि आयआऱबी कंपनीच्या निषेधाचे विविध प्रकारचे फलक घेवून आंदोलनात सहभागी झालेत.
सकाळपासून सुरु झालेलं आंदोलन सायंकाळी पाचवाजेपर्यत सुरु होतं. राज्य सरकारनं कायद्याच्या चाकोरीत राहून कोल्हापूरात आय़.आर.बी कंपनीकडून सुरु केलेली वाटमारी कोल्हापूरची जनता खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.