`के२एस`चा थरारक ट्रेक

ट्रेक करणाऱ्यांसाठी आपलं कसब आजमावून घेण्याची संधी देणारी k2s अर्थात कात्रज ते सिंहगड ही स्पर्धा पार पडली. तब्बल १४ डोंगर आणि ३ टेकड्या पार करत सिंहगड सर करण्याची ही धाडसी स्पर्धा अनेकांना वेगळाच अनुभव देणारी ठरली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 27, 2013, 10:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ट्रेक करणाऱ्यांसाठी आपलं कसब आजमावून घेण्याची संधी देणारी k2s अर्थात कात्रज ते सिंहगड ही स्पर्धा पार पडली. तब्बल १४ डोंगर आणि ३ टेकड्या पार करत सिंहगड सर करण्याची ही धाडसी स्पर्धा अनेकांना वेगळाच अनुभव देणारी ठरली. झी मीडियाच्या टीमनेही हा धाडसी मार्ग पूर्ण केला...

कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात रोषणाईत न्हाहून निघालेल्या पुण्याचं दर्शन ..संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा...कधी कधी वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश...रात्री मध्यान्हवेळेसारखी पडणारी स्वत:चीच सावली....दम लागल्यावर एखाद्या थंडगार कातळावर आडवे होवून फुललेला श्वास आणि शांत वारा यांची घातलेली सांगड.… मधेच पडणारा पाऊस… हा मन मोहून टाकणारा अनुभव घेतला K2S अर्थात कात्रज ते सिंहगड ट्रेक मध्ये सहभागी झालेल्या धाडसी वीरांनी… अर्थात झी मिडिया च्या टीम ने ही हा अनुभव घेतलाच. जेवढा आल्हाददायक हा अनुभव होता तेवढाच खडतरही … काही टेकड्यांवर तर चालणंही मुश्किल. तिथ पर्याय फ़क़्त घसरत जाण्याचा.. निसरड्या वाटा, अगदी सरळ जाणरे उतार तर कधी चढ..
एक एक टेकडी पार करत सिंहगड गाठणं तसं धाडसाच..कात्रज सिंहगड या ट्रेक मधे... एकूण १३ टेकड्या त्यात ४ मोठे डोंगर साधारण १६-१७ किमी चा ट्रेक आणि घाटात उतरून पुन्हा ६.५ किमी चा walk अशी साधारण दिवसभरात २४-२५ किमी ची पायपीट या ट्रेक मध्ये करावी लागते. पण काही ही असल तरी हा ट्रेक या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकालाच एक जबरदस्त अनुभव देणारा ठरलाय. स्वत: चा स्टॅमिना किती याचा अंदाज तर मिळतोच, पण एका धाडसी ट्रेक चा अनुभव गाठीशी राहतो. अर्थात ट्रेक सुरु करताना मनात असलेली मरगळ सिंहगड सर केल्यावर दूर होते याची प्रचीती प्रत्येकालाच हा ट्रेक देतो. म्हणूनच आमच्या टीमला ही ती मिळाली. आणि अर्थात त्यांच्या मनात भावना आली ती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x