www.24taas.com, पुणे
पुण्यातील कल्याणीनगर भागातील मुळीक मैदान येथे `कोशिंबा टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड` या संस्थेच्या वतीने ३१ डिसेंबर या दिवशी रात्री ८ वाजता पार्टीचे (नववर्ष मेजवानी) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची जाहिरात करणारी अर्धनग्न अवस्थेतील तरूणींची छायाचित्रे असणारे `फ्लेक्स` या परिसरात लावण्यात आले होते. या अश्लील कार्यक्रमाच्या विरोधात हिंदुत्वावाद्यांनी काल दुपारी संतप्त निदर्शने करून ही पार्टी रद्द करण्यास आयोजकांना भाग पाडले.
परिसरात लावलेल्या फ्लेक्सवरून यात अलि नृत्य होणार हे नक्की होते. याशिवाय १२ वर्षाच्या आतील मुलांना पालकांसमवेत विनामुल्य प्रवेश, ज्येष्ठ नागरीकांना ५० टक्के सवलत अशा प्रकारच्या योजनांचा यात समावेश होता. याची माहिती समजताच दुपारी ३ ते ५ या वेळेत १५0 हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी याविरोधात निदर्शने केली.
या वेळी कार्यकर्त्यांनी ३१ डिसेंबर निमित्त होणारे गैरप्रकार रोखा अशा आशयाचे फलक आणि भगवे झेंडे हातात धरले होते. या वेळी आयोजकांशी झालेल्या चर्चेदरम्यान आयोजकांना `अलि फ्लेक्स उतरावेत आणि अलि कार्यक्रम रहित करावा`, अशा सूचना केल्या. त्यानंतर आयोजकांनी लगेचच ७० हून अधिक फ्लेक्स काढले.
या प्रखर निदर्शनांची दखल घेत पोलिसांनीही आयोजकांना हा कार्यक्रम रहित करण्यात भाग पाडले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक शिवाजी वटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या कार्यक्रमात चार डीजेंना बोलवण्यात आले होते. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकारांचे नृत्यही आयोजित करण्यात आले होते.