www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात भूगर्भशास्त्रज्ञांनी वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचा अंश असल्याचा शोध लावलाय. या भागातल्या जमिनीत सोन्याच्या कणांचा अंश असल्याने ते झाडांच्या पानात उतरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय. त्यामुळे या भागातल्या संपत्तीचा शोध होण्याची गरज सर्व थरातून व्यक्त होतेय.
ऑस्ट्रेलिय़ात सोन्याची खाणी असलेल्या वुडिन्ना आणि कालगुर्ली भागात असलेल्या झाडांच्या पानामध्ये सोन्याचं कण सापडल्याची बातमी आम्ही तुम्हाला दाखवली होती. आता ऑस्ट्रेलियासाररखं सुवर्ण झाडं महाराष्ट्रातही आढळल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. मंगळवेढा परिसरातल्या वडाच्या झाडाचे बूड आणि वाळलेल्या पानात सोन्याच्या कणाचा अंश असल्याचं संशोधनात समोर आलंय.
मंगळवेढा परिसरात औरंगजेब बादशाहाचे तब्बल नऊ वर्षे वास्तव्य होते. या भागात जमिनीत वेगळ्याच प्रकारचा अंश असल्याचा दावा परिसरातले नागरिक करतायत.
शोभन सरकार या साधूला पडलेल्या स्वप्नावरुन उन्नाव परिसरात उत्खनन केलं होतं. मात्र मंगळवेढ्यात भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालाकडे सरकार गांभीर्यानं पाहयला तयार नाही. या भागातल्या जमीनीचं संशोधन तातडीनं हाती घेण्याची मागणी करण्यात येतीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.