www.24taas.com,पुणे
पुणे विद्यापीठ वादात सापडलंय. विद्येचं माहेरघर अशा लौकिकाला काळीमा फासणारी घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा प्रकार पुणे विद्यापीठात घडला होता.
याप्रकरणी पुणे विद्यापिठाच्या ४ बड्या अधिका-यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये पुनर्म्यूल्यांकन विभागाच्या अधिका-यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नाशकात पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाची उपेक्षा सुरु आहे.
जागा नसल्यानं नाशिक मनपाच्या भाड्याच्या दुकानात पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाचं कामकाज सुरु आहे. त्यामुळं नाशिकमधल्या विद्यार्थ्यांची दैना होतेय. इथं सोयीसुविधांचा अभाव असल्यानं त्यांना प्रत्येकवेळी पुणे विद्यापीठाची वाट धरावी लागतेय.
याप्रकरणी पुनर्मूल्यांकन विभागाचे उपकुलसचिव लालसिंग वसावे, सहाय्यक कुलसचिव राजेंद्र पंडित, वरिष्ठ लिपिक नंदा पवार यांच्यासह ओमान देशाच्या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.
पोलिसांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट चालवणा-या एकास अटक केल्यानंतर तीन कनिष्ठ लिपिक त्याच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. या लिपिकांच्या चौकशीत २१ विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाद्वारे गुण वाढवून उत्तीर्ण केल्याचे उघड झाले.