www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
करवीर निवासीनी महालक्ष्मीला कर्नाटकातील भक्तांकडून ६५तोळे सोन्याचा हार आणि सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे.
मेकपाटी राजगोपाल रेड्डी, खासदार राजमोहन रेड्डी आणि आमदार चंद्रशेखर रेड्डी यांच्याकडून हार आणि मुकूट देवीला अर्पण करण्यात आला आहे. ६५तोळ्याच्या हाराची किंमत साधारणपणे २०लाख रुपये इतकी आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानची स्थापना होवून तब्बल ९० वर्षांचा काळ लोटलाय. या काळात साईसंस्थानच्या उत्पन्नानं कोटीच्या कोटी उड्डाणं पार केली आहेत. स्थापनेवेळचे २३०० रुपये कुठे आणि या वर्षीचे केवळ रोख स्वरुपातील २७४ कोटी रुपये कुठे? सोने,चांदीच्या भेटवस्तू तर वेगळ्याच राहिल्या. साई संस्थानच्या उत्पन्नात प्रतिवर्षी २० टक्यांनी वाढ होत आहे.
साईबाबांना दिल्लीतल्या सतीश लोहिया या साईभक्तानं ५२१ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केलाय. या सोन्याच्या हाराची किंमत १४ लाख रुपये असून या सोन्याच्या हारांमध्ये तब्बल ५१ सोन्याची नाणी गोवण्यात आली आहेत.
जून महिन्यातली ही चौथी सुवर्ण भेट ठरलीय. जून महिन्यात ८० लाखांचे सुवर्ण अलंकार साईभक्तांनी शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलेत. यात ३० लाखांचा सोन्याचा हार, २३ लाखांचा सोन्याचा मुकूट, ९ लाख रुपयांचे सोन्याचे ग्लास चरणी अर्पण केलेत. हीच प्रथा आता कोल्हापुरात पाहायला मिळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ