www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सव्वा लाख किलो लाडू आणि सव्वा लाख किलो चिवडा… सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड करण्यासाठीचा हा घाट घातलाय पुणे मर्चंट्स चेंबरनं. मर्चंट्स चेंबरचा सामाजिक उपक्रम असेलल्या ना नफा, ना तोटा तत्वावरील लाडू चिवडा विक्रीला सुरुवात झाली.
दरवर्षी दिवाळीला हा अनोखा उपक्रम राबवला जातो. १९८७ पासून सुरु झालेल्या या सामाजिक उपक्रमाचं हे २६ वं वर्ष आहे. व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन गोर गरीबाची दिवाळी गोड करण्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर पुणे मर्चंट्स चेंबर तर्फे हा उपक्रम राबवला जातो.
४ ट्रक साखर, १५०० डबे तूप, २ ट्रक बेसन, २ ट्रक शेंगदाणे, २ ट्रक पोहे , १७ डबे तेल यांसह १ टन खोबरे, ४ टन किसमिस असा सगळा सरंजाम लाडू चिवडा बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे. सुमारे ५०० स्त्री पुरुष या कामामंध्ये रात्रंदिवस व्यस्त आहेत. या कामातून मिळणारं समाधान इतर कामांपेक्षा वेगळ असल्याची त्यांची भावना आहे.
पुण्यामध्ये विविध ठिकाणी हा फराळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. यावर्षी ८५ रुपये प्रती किलो या दराने हा लाडू चिवडा उपलब्ध आहे. सध्याच्या महागाईच्या काळात केवळ गोर गरिबांचीच नव्हे तर सगळ्यांचीच दिवाळी या लडू चिवड्यामुळे आनंददायी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.