www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
५१ हजार ४०२ हिरे ,
११, ३५२ माणके,
१ लाख , ७६ हजार , ०११ मोती
२७,६४३ पाचू
नीलम , पुष्कराज , पोवळी , लसन्या आणि हजारो जड जवाहीरे. अबब...ही संपती ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. या संपत्तीतून अमेरिकेला विकत घेतले जाऊ शकते.
ही संपत्ती आहे एकेकाळी दिल्लीचे तख्त गाजवणा-या पेशव्यांची. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ही संपत्ती पेशव्यांचीच असल्याचा पुरावा इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांना नुकताच शोधलाय. पुरालेखागार विभागामध्ये मिळालेल्या या कागदपत्रांमधील उल्लेखावरून पेशव्यांच्या श्रीमतीची आपल्याला प्रचिती येते.
या रत्नांची आत्ताची किंमत ५०० लाख कोटी इतकी असल्याचं दावा इतिहास तज्ज्ञांचा आहे. उन्नाव इथे पुरातत्व खात्याच्या वतीन सुरु असलेला खजिना नक्की कोणाच्या मालकीचा अशी उत्सुकता सर्वानाच आहे. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या मुख्य खजिन्यातल्या संपत्तीच्या तपशील मिळालाय. पेशव्यांच्या खजिन्यातील केवळ या जड-जवाहिरांची किंमत ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. मुख्य म्हणजे शनिवारवाड्याची ही श्रीमंती पद्मनाभ मंदिरात आढळलेल्या संपत्तीहून किती तरी जास्त आहे.
इंग्रजांनी १८१७ साली या खजिन्याची लूट केली होती. ही लुट झाल्या नंतरही या खजिन्यातली काही संपत्ती बाजीराव पेशव्यांनी आपल्यासोबत कानपूरला नेला होता. तो नंतर नानासाहेब यांना प्राप्त झाला. १८५७ च्या युद्धात नानासाहेब यांच्या शोधात असणा-या इंग्रजांच्या हातात पुन्हा एकदा नानासाहेबांचा खजिना पडला... लुट केलेल्या या खजिन्याची किंमत १ कोटी असल्याची नोंद इंग्रजांनी केली आहे.
आजच्या काळात याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. पेशव्यांच्या काळात एका राजाकडे एवढी संपत्ती होती यातूनच आपल्याला पेशावाईची श्रीमंती दिसून येते. पेशव्यांच्या या खजिन्याची लूट झाल्यानंतर ती संपत्ती कुठे आहे हे अजूनही गुढच आहे. परंतु पेशव्यांच्या या खाजिन्यामुळेच इंग्रज वैभवशाली झाल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ