दुष्काळाच्या सावटाखाली पैशाची उधळपट्टी

राज्यात दुष्काळाच सावट असताना अनेक ठिकाणी पैशाची उधळपट्टी मात्र सुरूच आहे. पुण्याजवळ खेड तालुक्यात निमगाव इथं सेना-भाजपच्या वतीन बैलागाड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 5, 2013, 07:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राज्यात दुष्काळाच सावट असताना अनेक ठिकाणी पैशाची उधळपट्टी मात्र सुरूच आहे. पुण्याजवळ खेड तालुक्यात निमगाव इथं सेना-भाजपच्या वतीन बैलागाड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या वेळी ग्राम दैवत असलेल्या खंडोबाचं मंदिर आणि बैलगाड्यांवर चक्क हेलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला.
एकीकडे बैलगाड्यांच्या शर्यतीतून मिळणारा पैसा दुष्काळग्रस्ताना देणार असल्याचं सांगणा-या आयोजकांना या वायफळ खर्चाबात विचारलं असता आम्ही नवस फेडत असल्याच त्यांनी सांगितलं. दुष्काळ असल्यामुळे भाषणातून गळे काढायचे आणि प्रत्यक्षात मात्र पैशांची वारेमाप उधळपट्टी करायची, हे राजकीय नेत्यांचे प्रकार सुरूच आहेत. यात सर्वपक्षीय नेते आघाडीवर आहेत. पिंपरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत चक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपनं ही शर्यत आयोजित केली होती.

तर आज इंदापूर को ऑपरेटीव्ह बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन राजेशाही थाटात पार पडलंय. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला.