www.24taas.com, राळेगणसिद्धी
जनलोकपाल बिल आणि भ्रष्ट्राचाराबाबत लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीहून येथे परतल्यानंतर स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आहे. अण्णांनी कोंडून घेतल्याने ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शुक्रवारपासून ते खोलीतून बाहेर आलेले नाहीत.
नवी दिल्ली येथील जंतरमंतरवरील उपोषण मागे घेतल्यानंतर हजारे यांनी टीम अण्णा बरखास्त केली. तसे त्यांनी ब्लॉगवर नमुद केले आहे. त्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलणे त्यांनी टाळले. येथे येऊन तीन दिवस झाले, तरी अण्णा कुणालाही भेटले नाहीत.
दरम्यान, विश्रांतीसाठी त्यांनी खोलीबाहेर पडण्याचे आणि जनतेला भेटण्याचे नाकारल्याचे समजते. बंद खोलीतच ते लिखाणही करत आहेत. ते भविष्यातील काय रणरिती असेल त्याबाबत ते चिंतन करीत असल्याचे म्हटले जात आहे.