www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये एका आय.टी कंपनीत काम करणा-या २२ वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. शहरात गेल्या ३-४ दिवसांत तब्बल ११ आत्महत्या झाल्यानं खळबळ उडालीय आणि विशेष म्हणजे तरुण वर्गात जास्त प्रमाणात आत्महत्या होत आहेत... या गंभीर समस्येबाबत `झी २४ तास`ने तरुणाईच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केलाय.
पिंपरी चिंचवडमध्ये मधुबन वसाहतीतील एका आय टी कंपनीत काम करणा-या २२ वर्षाच्या नितीन ज्ञानदेव साबळे या तरुणान आत्महत्या केली... काही दिवसापूर्वी आय. टी. मध्येच काम करणा-या मुलीन आत्महत्या केली होती... शहरात गेल्या ३ ते चार दिवसात तब्बल ११ आत्महत्या तर गेल्या सहा महिन्यात तब्बल ३३ आत्महत्या झाल्याचं उघड होतयं...
तरुणवर्गात वाढत चाललेल्या आत्महत्येच्या प्रमाणामुळे तरुणाईच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न आम्ही केला, तेव्हा पालक आणि समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी मत तरुणांनी व्यक्त केली.... हल्ली मुलांमध्ये वाढणारा तणाव आणि तुटत चाललेला संवाद हेच तरुणांमध्ये टोकाचं पाऊल घेण्यासाठी कारणीभूत ठरतंय... त्यामुळे पालकांनी तरुणांशी संवाद साधावा त्यांच्याशी मनमोकळं बोलाव अस मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.