भाजपचा पाठिंबा, नाशकात मनसेचा महापौर

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची आज घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे. या पाठिंब्यामुळे नाशकात मनसेचा पहिला महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: Mar 15, 2012, 11:06 AM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची आज घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे. या पाठिंब्यामुळे नाशकात मनसेचा पहिला महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या होत्या.  भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे नवा महापौर कोणत्या पक्षाचा होणार याचा सस्पेन्स वाढला होता. आता भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याने मनसेला दिलासा मिळाला आहे. महापौर निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहणार आहे. यतीन वाघ यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यतीन वाघ यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. महापौरपदासाठी ११ तर उपमहापौरपदासाठी ९ जणांनी अर्ज भरले आहेत. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या मनसेनं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मनसेसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि माकपनंही आपापले उमेदवार महापौरपदासाठी रिंगणात उतरवलेत. मात्र सत्येचं समीकरण नक्की होत नसल्याने प्रमुख पक्षांमध्ये दावेदारीसाठी लॉबिंग सुरु आहे. दुसरीकडे भाजपनं मदतीचे संकेत दिल्याने नाशिकमध्ये मनसेच्या नेत्यांचे हौसले बुलंद आहेत.

 

 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पळवापळवीचा प्रकार टाळण्यासाठी अज्ञातवासात गेलेले नगरसेवक परतीच्या वाटेवर आहेत. हे सर्वजण थेट मतदानाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतरच नाशिकचा नवा महापौर कोण यावरील पडदा उठणार आहे.