www.24taas.com , झी मीडिया, जमैका
फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ अर्थातच उसैन बोल्ट २०१६ऑलिम्पिकनंतर अॅथलेटीक्सच्या जगताला अलविदा करणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बोल्ट शेवटचा त्याच्या चाहत्यांना धावतांना पाहायला मिळणार आहे.
बोल्टच्या नावावर ६ ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स आहेत तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यानं १० मेडल्स पटकावले आहेत. मॉस्को वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल्सची कमाई करणा-या उसैन बोल्टनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. बोल्टच्या या निर्णयानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये रियोमध्ये होणा-या ऑलिम्पिकमध्ये उसैन बोल्ट त्याच्या चाहत्यांना रेस ट्रॅकवर शेवटचा धावतांना पाहायला मिळणार आहे. यानंतर फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ अशी बिरुदावली मिळवणा-या बोल्टच्य़ा जादूला त्याच्या चाहत्यांना मुकाव लागणार आहे.
६ ऑलिम्पिक गोल्ड आणि ऍथलेटीक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक १० मेडल्स अशी या जमैकन स्प्रिंटरची मेडल्सची कमाई आहे. रेस सुरु झाली की, काही कळायच्या आतच बोल्टनं फिनिश लाईन पार केलेली असायची. धावण्यासाठी आणि रेस ट्रॅकवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठीच बोल्टचा जन्म झाला आहे असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही.
बोल्ट नावाच्या या वेगाच्य़ा बादशाहानं आपल्या कामगिरीनं अवघ्या क्रीडा जगताला वेड लावलं. १०० मीटरचं अंतर ९.५८ सेकंदात पार करत त्यानं इतिहास रचला होता. तर २०० मीटरचं अंतर त्यानं १९.१९ सेकंदात पार करत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली होती. विक्रमांचा बेताज बादशाह असलेल्या बोल्टनं २०१६ च्या रियो ऑलिम्पिकनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला आणि त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.
आता त्याच्या चाहत्यांना बोल्टचं विनिंग ट्रॅकवरील सेलिब्रेशन पाहता तर येणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या नवनव्या विक्रमालाही बोल्टच्या चाहत्यांना मुकाव लागणार असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ