www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतावर ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याबाबत मज्जाव करण्यात आला आहे. भारताच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे भारताला ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नव्हते. ही बंदी आता अठविण्यात आली आहे.
भारतावर घालण्यात आलेली बंदी आज मंगळवारी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून (आयओसी) हटविण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय ऑलिंपिक संघटेनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी दिली.
आयओएने ९ फेब्रुवारीला घेतलेल्या निवडणुकांनंतर आयओसीने बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. आयओसी बंदी उठविण्याच्या निर्णयाबाबत आज माहिती कळविली आहे. आयओसीच्या बंदीमुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन भारतीय स्पर्धकांना भारताचा झेंडा घेऊन स्पर्धेत उतरता आले नव्हते.
डिसेंबर २०१२ मध्ये आयओएने निवडलेल्या समितीतील सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपनंतर आयओसीने भारताच्या ऑलिम्पिक प्रवेशावर बंदी घातली होती. त्यामुळे भारताला सोची ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या झेंड्याखाली उतरता आले नव्हते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.