www.24taas.com, वृत्तसंस्था, साओ पावलो
फुटबॉल वर्ल्ड कपमधील मोस्ट अवेटेड अशी मॅच डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पेन आणि उपविजेते नेदरलँड्समध्ये होणार आहे. 2010 मध्ये स्पेननं नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड कप विजयावर नाव कोरलं होतं. त्यामुळे या मॅचमध्ये ही ऑरेंज आर्मी गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्यास आतूर असेल.
आंद्रेस इनिएस्ताच्या याच गोल्डन गोलमुळे स्पेनला 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरता आलं होतं. नेदरलँड्सला पराभूत करत स्पेननं फुटबॉल वर्ल्ड कपला गवसणी घातली होती. आता 2010 च्या वर्ल्ड कपच्या फायनलमधील याच दोन टीम्स पुन्हा आमने-सामने येणार आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पॅनिश टीमला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जातेय. त्यांच्या टीमनं सहा वर्षांत दोनदा युरोपियन चॅम्पियनशिप आणि एक वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली आहे.
स्पॅनिश टीममध्ये स्टार्सचा भरणा आहे. तर नेदरलँड्सच्या टीमची भिस्त ही वेस्ली श्नायडर, अर्जेन रॉबेन आणि रॉबिन वॅन पर्सी या तिघांवर असेल. त्यातच ऑरेंज आर्मीला दुखापतींचाही फटका बसलाय. तर दुसरीकडे स्पॅनिश कॅप्टन ईकेर कॅसियस, सर्गियो रामोस, जेरर्ड पिके, अल्बा, अलोन्सो, आंद्रेस इनिएस्ता, फर्नांडो टोरेस आणि डेव्हिड विया अशी स्टार्सची मांदियाळी आहे. स्पेननं आपल्या गेल्या तीन मॅचेसमध्ये प्रतिस्पर्धी टीम्सना एकही गोल करू दिलेला नाही.
नेदरलँड्सनही आपल्या मागील तीन मॅचेस जिंकल्यात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही चांगलाच वाढलेला असणार आहे. ऑरेंज आर्मी गेल्या वर्ल्ड कप फायनलच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल. फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच मागील वर्ल्ड कपमधील फायनलिस्ट टीम या पुढच्या वर्ल्ड कपच्या लीग मॅचेमध्ये आमने-सामने आल्या आहेत. दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं फुटबॉल प्रेमींना एक हायवोल्टेज मॅच पाहायला मिळणार यात शंकाच नाही.
आता डिफेंडिंग चॅम्पियन स्पेन नेदरलँड्सला पराभूत करत विजयी सलामी देते की, ऑरेंज आर्मी स्पॅनिश आर्माडाचं आव्हान मोडित काढण्यात यशस्वी ठरते का ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.