प्रशांत सादर करतोय विश्वविक्रमी प्रयोग!

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा प्रशांत आज विश्वविक्रमी प्रयोग सादर करणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2013, 10:01 AM IST

www.24taas.com, मुंबई
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा प्रशांत आज विश्वविक्रमी प्रयोग सादर करणार आहे.
मराठी रंगभूमीवर विनोदी अभिनयात आपली स्वत:ची वेगळी शैली निर्माण करणारा अभिनेता म्हणजे प्रशांत दामले... हाच प्रशांत आज रविंद्र नाट्य मंदीरमध्ये `गेला माधव कुणीकडे` या नाटाकाचा १,७४६ वा प्रयोग सादर करणार आहे. हा प्रयोग प्रशांत दामले यांच्या कारकिर्दीतला १०,७०० वा प्रयोग आहे आणि याच विश्वविक्रमाची जागतिक स्तरावर नोंद होणार आहे. याआधी एका जपानी कलाकाराने दहा हजारहून अधिक प्रयोग करून आपल्या नावे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला होता. मात्र, आता त्याचाही रेकॉर्ड मोडित काढत प्रशांत दामले नवा विक्रम नोंदवणार आहेत. मराठी रंगभूमीसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.