`मोहन प्यारे` पुन्हा जागा झाला

ज्या नाटकाने सिद्धार्थ जाधव याला एक ओळख दिली ते नाटक म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’. तब्बल दीड वर्षानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं.. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकाच दिवशी तीन प्रयोग करत सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या टीमने जोरदार पुनरागमन केल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2013, 04:36 PM IST

www.24taas.com, पुणे
ज्या नाटकाने सिद्धार्थ जाधव याला एक ओळख दिली ते नाटक म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’. तब्बल दीड वर्षानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं.. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकाच दिवशी तीन प्रयोग करत सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या टीमने जोरदार पुनरागमन केल. प्रेक्षकांच्या या प्रतिसादामुळ या नाटकचे किमान हजार प्रयोग तरी करू असा विश्वास सिद्धार्थ आणि टीमन व्यक्त केलाय.
सिद्धार्थ जाधवचं नाटक अस म्हंटल की जे नाव समोर येत ते म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’. २००६ मध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या नाटकान तुफान लोकप्रियता मिळवली. आणि सिद्धार्थ जाधव यालाही याच नाटकाने ओळख निर्माण करुन दिली. त्यावेळी तब्बल ५६० प्रयोग या नाटकाने केले होते. मात्र पुन्हा दिग्दर्शक प्रियदर्शन यादव याने सिद्धार्थला घेवून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. त्याचे पुण्यात आणि पिंपरीत तीन प्रयोग झाले, त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.
सिद्धार्थ जाधव पुन्हा रंगभूमीवर परत आल्यानं त्याच्या चाहत्यांन आनंद झालाय. त्यामुळे पूर्वी जस या नाटकाला प्रेक्षकांनी टोक्यावर घेतलं होतं तसाच यावेळीही घेतलंय. सिद्धार्थचं 1 हजार प्रयोगाचं स्वप्न पूर्ण व्हावं ह्याच त्याला शुभेच्छा