`एक चावट संध्याकाळ` महिलांनी पण पाहिलं

एक चावट संध्याकाळ या वादातीत नाटकाचा प्रयोग याआधी फक्त पुरुषांसाठी होत होता.पण नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला महिलांनाही हा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली.

Updated: Sep 1, 2012, 04:11 PM IST

www.24taas.com, मुंबई
एक चावट संध्याकाळ या वादातीत नाटकाचा प्रयोग याआधी फक्त पुरुषांसाठी होत होता.पण नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला महिलांनाही हा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. यापुढे नाटकाचे प्रयोग प्रौढ महिला आणि पुरुषांना पाहता येतील..
फक्त पुरुषांसाठी प्रयोग होणा-या एक चावट संध्याकाळ या नाटकाचे प्रयोग आता महिलांसाठीही खुले करण्यात आले.फक्त पुरुषांसाठी हा बोर्ड उतरवून फक्त प्रौढांसाठी असा बोर्ड लावण्यात आला.. नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला पुरुषांची गर्दी होतीच पण महिलांची संख्याही ब-यापैकी पाहायला मिळाली.

एका महिलेला या नाटकाच्या प्रयोगाला प्रवेश नाकारल्यानंतर नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मुंबई महापालिकेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता याच अशी जाहीरात करत निर्माते-दिग्दर्शक अशोक पाटोळे यांनी नाटकाचा प्रयोग महिलांसाठीही खुला केला.. मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील विनोद रंगमंचावर आणणा-या एक चावट संध्याकाळ नाटकाला गर्दी करावी की नाही हे येत्या काळात प्रेक्षकच ठरवतील.