www.24taas.com, नवी दिल्ली
आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांच्या अंतरंगात पोहचण्याचा प्रयत्न करणारा आमिर खाननं आता टाईम मॅगझिनच्या कव्हर पेजवरदेखील स्थान मिळवलंय. टाईम मॅगझीनच्या कव्हर पेजवर जागा मिळवणारा आमिर पहिला भारतीय पुरुष अभिनेता आहे.
नुकत्याच ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवर आवाज उठवून सगळ्या देशात आमिरनं एकच खळबळ उडवून दिली होती. अनेक सामाजिक प्रश्न या माध्यमातून लोकांच्या ह्रद्यापर्यंत पोहचले आणि आमिरही... त्यानंतर आता आमिरनं टाईम मॅगझिनच्या कव्हर पेजवरही जागा मिळवलीय. आमिर हा बॉलिवूड जगतातला तिसरी व्यक्ती आहे, ज्याचा चेहरा टाईम्सच्या कव्हर पेजवर झळकलाय. आमिर हा ‘टाईम’च्या कव्हर पेजवर झळकणारा पहिला भारतीय पुरुष अभिनेताही ठरलाय. यानंतर बॉलिवूनडमध्ये आमिरची जागा नक्कीच उंचावली आहे, हे नक्की.
आमिरनं सामाजिक प्रश्नांना मोठ्या खुबीनं पकडून तो लोकांच्या निदर्शनास आणून देता देता बॉलिवूडकरांनाही धक्का दिलाय. टाईम्सनं आमिरच्या याच विशेषत्वाला रेखाटलंय. जिज्ञासा आणि नव्याची आस या आमिरच्या गुणांनाही त्यांनी उजाळा दिलाय. ‘एक अभिनेता देशाला बदलू शकतो का?’ असा प्रश्नही यामाध्यमातून टाईम्सनं यावेळी विचारलाय.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबी आणि ऐश्वर्या राय यांना ही संधी मिळाली होती. तर वेगवेगळ्या क्षेत्रांतील भारतीय व्यक्तींमध्ये राजीव गांधी, नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, सचिन तेंडूलकर, सानिया मिर्झा आणि डॉ. मनमोहन सिंग यांनाही टाईम्सनं कव्हर पेजवर जागा पटकावली आहे.