आघाडी सरकारला जाग, टोल दर काढणार तोडगा

मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याच्या दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आलीय. बैठकीला पीएनजी कंपनीचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 23, 2014, 11:39 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याच्या दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आलीय. बैठकीला पीएनजी कंपनीचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
कायम कुठल्या नं कुठल्या कारणानं चर्चेत राहणा-या पिंपळगावच्या टोल नाक्यावर तब्बल तिपटीनं दरवाढ होणारेय. स्थानिक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांच्या विरोधामुळे याआधी दोन ते तीन वेळा दरवाढ पुढे ढकलण्यात आलीय. महामार्गाचं काम पूर्णत्वास येत असल्यानं दरवाढ करण्यावर कंपनी व्यवस्थापन ठाम आहे.
प्रस्तावित दरवाढी नुसार ४० रुपयाच्या ऐवजी कार, जीपला १४० रुपये तर हलक्या मालवाहू गाड्यांना ६५ ऐवजी २२० रुपये लागणारेत. बस, ट्रक आणि अवजड वाहनांचीही हीच अवस्था आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय तोडगा निघतो त्याकडे लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.