साई भक्तांना मिळणार स्वस्तात आलिशान खोल्या

शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे... साई आश्रम फेज १ या निवासस्थानाचं भाडं कमी करण्यात आलंय. चेन्नई इथले साईभक्त के. व्ही. रमणी यांनी दिलेल्या ११० कोटी रुपयांच्या देणगीतून भाविकांसाठी हे निवासस्थान बांधण्यात आलंय.

Updated: Dec 15, 2013, 09:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी
शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे... साई आश्रम फेज १ या निवासस्थानाचं भाडं कमी करण्यात आलंय. चेन्नई इथले साईभक्त के. व्ही. रमणी यांनी दिलेल्या ११० कोटी रुपयांच्या देणगीतून भाविकांसाठी हे निवासस्थान बांधण्यात आलंय.
शिर्डीत येणारे साईभक्त साई संस्थानच्या भक्ती निवासात मुक्काम करणं अधिक पसंत करतात. चेन्नई इथले साईभक्त के. व्ही. रमणी यांनी साई संस्थानला दिलेल्या तब्बल ११० कोटींच्या देणगीतून साई आश्रम १ आणि २मध्ये १५३६ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या आलिशान आणि आरामदायक खोल्यांचं भाडं मात्र न परवडणारं असल्याची भाविकांची तक्रार होती. त्या दृष्टीनं आता साईबाबा संस्थानच्या त्रिसदसीय समितीनं हे भाडं कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय...

तर आता शिर्डीतल्या साई संस्थानच्या खोल्यांचं आरक्षण भाविक www.online.sai.org.in या वेबसाईटवरून करु शकतात. इतकंच नाही तर साईंचं दर्शन मनोभावे आणि समाधानानं व्हावं यासाठीही साई संस्थान नवा प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं साईभक्तांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.