www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. त्याचबरोबर व्हीआयपी पासवाल्यांचीही गर्दी वाढत होती.
व्हीआयपी दर्शनामुळं सर्वसामान्य भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून साईबाबा संस्थानानं प्रायोगिक तत्वावर सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू केली होती. मात्र ही सुविधा शनिवार आणि रविवार हे दोनच दिवस उपलब्ध होती.
मात्र आता संस्थानानं सोमवारपासून ही सशुल्क सेवा सर्व दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. व्हीआयपी भाविकांना आता काकड आरतीसाठी ५०० रूपये, तर अन्य तीन आरत्यांसाठी प्रति माणशी ३०० रूपये मोजावे लागणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ