सुलाची नवी वाईन!

वाईनच्या वेगवेगळ्या चवी देण्याची परंपरा नाशिकच्या वाईन कॅपिटल ऑफ इंडियानं कायम राखली आहे. देशात पहिल्यांदाच रेड वाईन प्रकारातील वाईन माईल्ड शॅम्पेन लाँच करून वाईन रसिकांना एक नवीन व्हरायटी पेश केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 17, 2013, 10:28 PM IST

www.24taas.com, नाशिक
वाईनच्या वेगवेगळ्या चवी देण्याची परंपरा नाशिकच्या वाईन कॅपिटल ऑफ इंडियानं कायम राखली आहे. देशात पहिल्यांदाच रेड वाईन प्रकारातील वाईन माईल्ड शॅम्पेन लाँच करून वाईन रसिकांना एक नवीन व्हरायटी पेश केली आहे.
इटलीतल्या सुप्रसिद्ध वाईनमेकर पोलिना बोस्का यांनी भारतीय वातावरणासाठी ही खास चव बनवली आहे. भारतीय वातावरणाला अनुकूल अशी ही खास चव बनवली आहे. चटपटीत खाद्यान्नासोबत काहीशी गोड असलेली ही माईल्ड स्पार्कलिंग वाईन या प्रकारात मोडते.

कोरफड, शतावरी सारख्या वाईनही यापूर्वी नाशिककरांनी देशाला दिल्या आहेत. आता या नव्या वाईन मुळे वाईन विश्वातील आपली घौडदौड कायम ठेवली आहे.