धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात मातृत्वाला काळीमा!

धुळ्यामध्ये जिल्हा रुग्णालयात मातृत्वाला काळिमा फासणारा प्रकार समोर आलाय. नुकत्याच जन्मलेल्या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये सोडून जन्मदात्या आईनं पळ काढलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 30, 2013, 07:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळ्यामध्ये जिल्हा रुग्णालयात मातृत्वाला काळिमा फासणारा प्रकार समोर आलाय. नुकत्याच जन्मलेल्या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये सोडून जन्मदात्या आईनं पळ काढलाय.
या मुलीचा सांभाळ आता रुग्णालयातले डॉक्टर आणि कर्मचारी करताय. कमी दिवसात प्रसुती झाल्यानं मुलीचं वजन कमी आहे. त्यामुळं कर्मचा-यांना दर तीन तासांनी नाकातून टाकलेल्या नळीद्वारे या नवजात शिशूला दूध पाजवं लागतंय. मुलीची स्थिती नाजूक असल्यानं पुढच्या उपचारासाठी बालरुग्ण विभागात मुलीसह महिलेला पाठवलं गेलं होतं.
मात्र या संधीचा फायदा घेऊन या महिलेनं रुग्णालयातून पळ काढला. या प्रकरणी महिलेचा शोध सुरुय. महिला न सापडल्यास मुलीला सुधारगृहात पाठवलं जाणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.