असंगाशी संग, मित्राने कापलं मित्राचं लिंग!

पैशांच्या वादातून आपल्या मित्राचं लिंगच कापरून टाकल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हॉटेलात घडली. दोघेही मित्र सौदी अरेबियात वास्तव्याला होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 21, 2013, 04:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
पैशांच्या वादातून आपल्या मित्राचं लिंगच कापरून टाकल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हॉटेलात घडली. दोघेही मित्र सौदी अरेबियात वास्तव्याला होते.
गेल्या काही दिवसांपासून दोघे मित्र भुसावळच्या एका लॉजमध्ये राहात होते. हे कृत्य करणारा आरोपी कामरान खान सौदी अरेबियात ड्रायव्हर म्हणून तर दुसरा मित्र फारूक शेख सलून चालवत होता. मूळच्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुमील गावात राहाणाऱ्या फारुकने कामरानला पैसे उसने दिले होते. फारूक मुंबईतला असल्याने मुंबईला गेल्यावर हे पसे परत करण्याचं ठरलं होतं.
मात्र, प्रवासात ते भुसावळमध्ये एका लॉजमध्ये थांबले. त्यावेळी त्यांच्यात काही वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात कामराननं फारुखचं लिंग तीक्ष्ण हत्याराने कापलं. या घटनेमागे अनैतिक संबंधांची मागणी केल्याचीही चर्चा आहे. सध्या फारुखला उपचारांसाठी औरंगाबादला रवाना करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.