धुळ्यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचा लाच घेताना अटक

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना तब्बल दोन लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2017, 08:52 AM IST
धुळ्यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचा लाच घेताना अटक title=

धुळे : माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना तब्बल दोन लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा रचला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये दाखल झालेल्या शिक्षक नियुक्त्यांचा भंग केल्या प्रकरनातं आरोपी न करण्यासाठी एका कारकुनाकडून या दोघांनी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती लाचेची रक्कम दोन लाख ३० हजार ठरविण्यात आली. गेल्या एक महिन्यापासून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सापळा रचून होता. सर्व शहनिशा करूनच हि कारवाई करण्यात आली आहे. 

सरस्वतीच्या मंदिरात भ्रष्टचाटाचार हा खेळ घृणास्पद असला तरी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि किशोर पाटील यांचे समर्थक शिक्षकांनी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात गर्दी केली होती. महिन्याभरात जिल्ह्यात वर्ग एकचे अधिकारी लाच घेताना पकडले जाण्याची ही दुसरी घटना आहे.