www.24taas.com, सोलापूर
राज्यात पडलेला दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप जलतज्ज्ञ अरुण देशपांडे यांनी केलाय. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी वॉटर बँकेसारखे पर्याय सुचवलेत.
महाराष्ट्र सध्या दुष्काळानं होरपळतोय. मात्र, हा दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे आणि राज्यकर्ते केवळ दुष्काळाच्या काळात जनतेची लूटमार करत असल्याचा आरोप अरुण देशपांडेंनी केलाय. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेला पाण्याचा भरमसाठ वापर तसंच पाण्याचा अपव्ययच पाणीटंचाईला कारणीभूत आहे. त्यामुळे या दुष्काळावर मात करायची असल्यास वॉटर बँकेसारखे प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं देशपांडेंनी म्हटलंय. अरुण देशपांडेंनी स्वत: वॉटर बँकेचा यशस्वी प्रयोग केलाय.
दुष्काळावर राज्यकर्त्यांना खरंच मात करायची असल्यास राज्यात जल साक्षरता, ऊर्जा साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता करणं गरजेचं आहे. तरंच आपण दुष्काळावर खऱ्या अर्थानं मात करू शकणार आहोत.