बोअरमध्ये पडलेल्या १८ महिन्याच्या चिमुरड्याची सुटका

`देव तारी, त्याला कोण मारी` या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला... इथल्या खैरी निमगाव शिवारातील एका बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 1, 2014, 11:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
`देव तारी, त्याला कोण मारी` या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला... इथल्या खैरी निमगाव शिवारातील एका बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय.
पटारे यांच्या वस्तीवर ऊस तोडणी कामगार काम करत असतांना विलास निकम या ऊस तोडणी कामगाराचा १८ महिन्यांचा चिमुकला शेजारीच शेतात असलेल्या एका बोअरवेल मध्ये पडला होता. या मुलाचा तीन वर्षाचा भाऊ बरोबर खेळत होता. त्यानं आपला भाऊ खड्यात पडल्याचं पाहून आईवडिलांना सांगितलं. यानंतर तातडीनं या ठिकाणी मदत कार्य सुरु झालं.
दिडशे फुट खोल असलेल्या या बोअर वेल मध्ये हा मुलगा तीस फुटांवर अडकला होता. गावकरी आणि स्थानिक प्रशासनानं तातडीनं या ठिकाणी मदकार्य सुरु केलं. मुलाला ऑक्सिजनचा पुरवठाही करण्यात आला. तीन डोझरच्या सहाय्यानं मुलाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु होते, अखेर रात्री उशीरा या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. सध्या त्याला प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.