<b><font color=red>आदर्श घोटाळाः</font></b> तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 20, 2013, 03:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.
आदर्श घोटाळ्याची चौकशी करणा-या न्या. जे. ए. पाटील आयोगाने अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या काँग्रेसच्या तिघा माजी मुख्यमंत्र्यांसह तत्कालिन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्यावरही गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्याशिवाय तत्कालिन नगरविकास राज्यमंत्री सुनील तटकरे आणि राजेश टोपे या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही आयोगाने ठपका ठेवलाय...
आदर्शमधील फ्लॅट्सच्या खरेदीत बेनामी व्यवहार झाल्याचा निष्कर्षही अहवालात काढण्यात आल्याने मंत्रिमंडळातील काही मंत्र्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी काही नेतेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे सगळे आदर्शचे आश्रयदाते असल्यासारखे वागले, अशा शब्दांत आयोगाने कानउघाडणी केलीय.
परंतु आदर्श आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारने फेटाळून लावला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांचा भडका उडालाय. आदर्श घोटाळ्यात अडकलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सरकार पाठीशी घालत आहे, अशी घणाघाती टीका विरोधकांनी केलीय. आदर्श प्रकरणी आता जनतेच्या न्यायालयातच दाद मागू, असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय.

आदर्श घोटाळा चौकशी अहवालातील ठळक मुद्दे
- विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, राजेश टोपे यांच्यावर अहवालात ताशेरे
- या सगळ्यांनी आदर्शचे आश्रयदाते म्हणूनच काम केले
- आदर्श हा केवळ भ्रष्टाचाराचाच आदर्श नमुना नाही, तर कायदे व नियमांचा भंग करण्याबाबतची एक लाजीरवाणी काहणी
- आदर्श आयोगाचे कडक शब्दात ताशेरे
- आदर्शमधून काही लोकांची हाव दिसून येते
- एक फ्लॅट मिळवून काही लोक थांबले नाहीत, तर आपल्या जवळच्या लोकांच्याही नावाने फ्लॅट लाटले
- फ्लॅट घेताना बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्याचाही उल्लंघन करून आदर्शमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी बेनामी फ्लॅट घेतले

महाराष्ट्रसारख्या प्रगत राज्यात अशी घटना घडणं खेदजनक
अधिकाऱ्यांवरही आदर्श चौकशी आयोगात ताशेरे
1 प्रदीप व्यास, पी. व्ही. देशमुख, रामानंद तिवारी, जयराज फाटक, अशोक चव्हाण, बाबासाहेब कुपेकर, एस. व्ही बर्वे यांनी परवानग्या देण्यासाठी आदर्शमध्ये फ्लॅट मिळवले
2 - आदर्शमध्ये 22 बेनामी व्यवहार
3 सेवा नियमाचा भंग केल्याप्रकरणी काही अधिकाऱ्यांवर ठपका.
4 यात सुभाष लाला, प्रदीप व्यास, सी. एस. संगीतराव, डी. के. शंकरन, आय. ए. कुंदन, थॉमस बेंजामिन, सुरेश जोशी, टी. चंद्रशेखर, उमेश लुकतुके यांचा समावेश
बेनामी फ्लॅट असलेली वरील नावे आहेत
यात उत्तम काकडे यांच्या नावावर असलेले फ्लॅट बेनामी
धोंडीराम वाघमारे, रुपाली रावराणे, मुकुंदराव मानकर, सांडूसिंग राजपूत, रघुनाथ भोसले, विश्वास चौघुले, सुरेश अत्राम, सुधाकरक मडके, राजेश बोरा, जगदीशप्रसाद शर्मा, परमानंद हिंदुजा, मणिलाल ठाकूर, परमहंस राम, कर्नल अमरजिंत सिंग, किरण भडंगे, मदनलाल शर्मा, लेफ्टनंट कर्नल अरुण सिंग, शीतल गंजू, अमरसिंग वाघमारे, विशाल केदारे, एस. व्ही .बर्वे
आदर्शच्या 102 सदस्यांपैकी 25 सदस्य अपात्र आहेत
त्यात बाबासाहेब कुपेकर, व्हाईस अॅडमिरल मदनजित सिंग, सुरेश प्रभू, देवयानी खोब्रागडे, आदित्य पाटील, अर्चना तिवारी, एस. बी. चव्हाण, सीमा शर्मा, गिरश मेहता, संजय शंकरन, संजय राडकर, कैलास गिडवाणी, भावेश पटेल, अभय संचेती, मदनलाल शर्मा, शिवाजी काळे, रुपाली रावराणे, रणजित संगीतराव, कॅप्टन प्रवीण कुमार, भगवती शर्मा (अशोक चव्हाण सासू), कृष्णाराव भेगडे, जॉन मथायस, निवृत्ती भोसले, अरुण ढवळे
- वरील सदस्य पात्र नव्हते... तरीही फ्लॅट मिळाला

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.