बाळा नांदगावकरांसमोर मनसेचे दोन गट भिडले

लोकसभा उमेदवारी संदर्भात चाचपणी करण्यासाठी चंद्रपुरात आलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोरच मनसेचे दोन गट एकमेकांशी भिडले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 17, 2014, 01:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
लोकसभा उमेदवारी संदर्भात चाचपणी करण्यासाठी चंद्रपुरात आलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोरच मनसेचे दोन गट एकमेकांशी भिडले.
चंद्रपूर जिल्हा मनसेप्रमुख विजय मराठे जिल्ह्यात एक चिट फंड कंपनी चालवतात. या चिटफंडमध्ये फसवणूक झालेल्या महिला आपले पैसे परत मिळावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करतायत.
नांदगावकरांच्या सभेत या महिलांनी पत्रकं झळकावत घोषणाबाजी केली.जिल्हा प्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना रोखून त्यांना धक्काबुक्की केली. त्याचवेळी माजी नगरसेवक अनिल दडमल यांचा गट या महिलांच्या मदतीला धावला. या मदतीमुळे संतापलेल्या मराठे यांच्या कार्यकर्त्यांनी दडमल यांना बेदम चोपले.
जिल्हाप्रमुख विजय मराठे यांच्या कारनाम्यांची योग्य ती दखल घेण्याची मागणी दडमल यांनी केली आहे.हे सर्व बाळा नांदगावकर यांच्यासमोरच घडत होते. घटनेनंतर मेळाव्यात बोलताना नांदगावकर यांनी या घटनेविषयी माफीही मागितली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.