www.24taas.com, नागपूर
फौजिया खान यांची ही खऱ्या अर्थाने मुजोरी आहे. आफ्रिकेत परवानगी आहे की, नाही हे माहीत नाही मात्र प्राण्यांची काळजी घेणं, प्राण्याचं जतन करणं आणि त्याचं संवर्धन केलं जावं.. इतकचं नव्हे तर प्राण्यांची मुलासारखी काळजी शासनाकडून घेतली जाते..
रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फोटो काढणं आणि त्याचे फोटो वेबसाईटवर टाकणं अत्यंत चुकीचं आहे. फौजिया खान यांच्यासारख्या मंत्र्यांनी केलेली ही कामगिरी अतिशय खेदजनक आहे. अशी मनसे फौजिया खान यांच्यावर टीका केलेली आहे. मनसे आमदार प्रविण दरेकर यांनी ‘झी २४ तास’कडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तर विरोधी नेते एकनाथ खडसे यांनीही टीका केली आहे. ‘खरं म्हणजे राज्यात नव्हे तर देशभरात आम्ही पशू संवर्धन झालं पाहिजे यासाठी काळजी घेत असतो. त्याची मोहिम हाती घेतो. प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि प्रजनन होण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जातं. आणि सरकारचेच मंत्री शिकारीला प्रोत्साहन देतात.
हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार होऊ नये. शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचा एक अनोखा कारनामा उघड झालाय. दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झालय.