राज्यात अंधार, चार वीजनिर्मिती केंद्रात बिघाड

शंभर दिवसात महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार अशी घोषणा करून काही दिवसच उलटत नाही, तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा अंधारात गेला आहे.

Updated: Oct 17, 2012, 02:59 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर

शंभर दिवसात महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार अशी घोषणा करून काही दिवसच उलटत नाही, तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा अंधारात गेला आहे. राज्यातील चार विविध वीजनिर्मिती केंद्रांमध्ये अचानक बिघाड झाल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यात सुमारे १००० मेगावॅट विजेचा तुडवडा जाणवत आहे.
चंद्रपूर, कोराडी, नाशिक आणि पारस या वीजनिर्मिती केंद्रांमध्ये बिघाड झाला आहे. चंद्रपूरमध्ये ५०० मेगावॅट, कोराडी २१० मेगावॅट, नाशिक २१० मेगावॅट आणि पारस केंद्रामध्ये २५० मेगावॅटची वीजनिर्मिती होते. मात्र या विजेच्या केंद्रांमध्ये बिघाड झाल्याने काही ठिकाणी भारनियमनाची शक्यता आहे.
विजेच्या या तुटवड्यामुळे राज्यातील ज्या भागांमध्ये भारनियमन बंद झालं होतं, तिथेही भारनियमन सुरू करण्यात आलं आहे.