सुरेशदादांनंतर गुलाबराव देवकरांचीही तुरुंगात रवानगी

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 31, 2013, 01:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत.
सुप्रीम कोर्टानं औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टानं देवकरांना दोन आठवड्यात शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवकरांची आज मुदत संपली होती. याअगोदरच, घरकुल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन हे तुरूंगात आहेत. आता या प्रकरणात देवकर हे जेलमध्ये जाणारे दुसरे माजी मंत्री ठरणार आहेत.
घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकरांना यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिल्यामुळं ते गेल्या काही महिन्यांपासून बाहेर होते. मात्र अखेर त्यांची आज तुरूंगात रवानगी झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.