आईस्क्रीमचे आमिष दाखवून चिमुरडीवर बलात्कार

नागपूरमध्ये सहावर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये हा प्रकार घडलाय.

Updated: May 4, 2013, 03:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरमध्ये सहावर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये हा प्रकार घडलाय.
येथील कुलदीप मंगल कार्यालयात लग्नासाठी गेलेल्या मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आलाय. हा बलात्कार करणारा नराधम राकेश बेलेला अटक करण्यात आलीय. पीडित मुलगी आईसोबत कन्हान येथील तारसा रोडवर कुलदीप मंगल कार्यालयात लग्नासाठी आली होती.

दुपारी एकच्या सुमारास राकेशने मुलीला आईस्क्रीमचे आमीष दाखवून मंगल कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर नेले. तेथे बलात्कार केला. यानंतर तो तेथून निघून गेला. घटनेनंतर पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्‍यानंतर तिच्‍या कुटुंबियांनी पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली.