झी २४ तास अनन्य सन्मान २०१५

 भारत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्र राज्याचे स्थान खूप खास आहे. महाराष्ट्राने समाजाच्या सर्वच क्षेत्रात भरीव काम करणारी व्यक्तीमत्वं देशाला दिली आहेत. राजकारण, संगीत, खेळ, चित्रपट, साहित्य, नाटक, फॅशन, उद्योग, समाजसेवा, शेती, पत्रकारिता किंवा वैद्यकशास्त्र अशा सर्वच क्षेत्रांत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्रातील व्यक्तींचे योगदान अनन्यसाधारण आहे. 

Updated: Feb 9, 2016, 05:02 PM IST
झी २४ तास अनन्य सन्मान २०१५ title=

मुंबई :  भारत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्र राज्याचे स्थान खूप खास आहे. महाराष्ट्राने समाजाच्या सर्वच क्षेत्रात भरीव काम करणारी व्यक्तीमत्वं देशाला दिली आहेत. राजकारण, संगीत, खेळ, चित्रपट, साहित्य, नाटक, फॅशन, उद्योग, समाजसेवा, शेती, पत्रकारिता किंवा वैद्यकशास्त्र अशा सर्वच क्षेत्रांत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्रातील व्यक्तींचे योगदान अनन्यसाधारण आहे. 

या झगमगत्या आणि प्रसिद्धीसाठी झगडणाऱ्या जगात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या कोणत्याही अपेक्षेशिवाय अतुलनीय कामगिरी करत आहेत. या व्यक्तींनी समाजाच्या विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी आज अनेकांना प्रेरणादायी ठरू शकते. 

आपल्यातील अनेक जण अशा चर्चेत न राहणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत आपापसात बोलत असतात. पण, या व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा महाराष्ट्राच्या अभिमानाची बात येते तेव्हा 'झी २४ तास'ने त्यासाठी पुढे येणे हे अपेक्षितच आहे. 

महाराष्ट्रातील पहिली आणि आघाडीची मराठी वृत्तवाहिनी म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे.

'झी २४ तास अनन्य सन्मान'च्या या आठव्या वर्षातही आम्ही खेळ, मनोरंजन, समाजसेवा, शिक्षण, शेती, पर्यावरण आणि शौर्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, पण झगमगाटापासून नेहमी दूर राहणाऱ्या व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा पुढे नेणार आहोत. यापैकी एका क्षेत्रातील एका असाधारण व्यक्तीच्या कार्याचा गौरव त्यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन करण्याची परंपरा आहे. 

यापूर्वीही 'झी २४ तास अनन्य सन्मान'च्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रांतील अनेक यशस्वी मराठी व्यक्तीमत्वांचा गौरव केला आहे. या सोहळ्यांना केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. 

'झी २४ तास अनन्य सन्मान २०१५' चा सोहळा मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी परेल येथील 'आय. टी. सी. ग्रँड सेंट्रल' येथे पार पडणार आहे.