बाईट स्टंटबाजी बेतली जीवावर

बाईक स्टंटबाजी एकाच्या जीवावर बेतल्याची घटना मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन इथं घडलीय. मोकळ्या जागेवर रात्रीच्या वेळी टवाळखोर बाईकस्वारांकडून भरधाव वेगात स्टंटबाजी सुरु असते.

Updated: Dec 19, 2016, 11:01 AM IST
बाईट स्टंटबाजी बेतली जीवावर title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : बाईक स्टंटबाजी एकाच्या जीवावर बेतल्याची घटना मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन इथं घडलीय. मोकळ्या जागेवर रात्रीच्या वेळी टवाळखोर बाईकस्वारांकडून भरधाव वेगात स्टंटबाजी सुरु असते.

अशीच स्टंटबाजी करणा-या बाईकस्वाराला रविवारी रात्री जीव गमावावा लागलाय. स्टंटबाजी करत असताना आपल्याच गँगमधील बाईकशी धडकल्याने 22 वर्षीय अभिजीत गुरव याचा मृत्यू झालाय. ही टक्कर इतकी भीषण होती की बाईकने लगेचच पेट घेतला.

या घटनेत आकाश राजपूत आणि जफर शेख हे दोघं गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून स्टंटबाजी करणा-यांवर कारवाई केली जाते. मात्र तरीही बाईक स्टंटबाजी करणा-या गँगकडून त्याकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे आता अशा टवाळखोर बाईकस्वारांना आवरण्यासाठी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे.