video : राजकीय धुरंधरानंतर 'महाराष्ट्राचा चिमुकला तानसेन'

श्रीगोंदा येथील घनश्याम दरोडे या राजकीय धुरंधर यूट्यूब, फेसबूक आणि व्हॉ़टसअॅप धुमाकूळ घातल असताना आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा आहे महाराष्ट्रातील एका छोट्या तानसेनाचा.... 

Updated: Jan 14, 2016, 08:18 PM IST
video : राजकीय धुरंधरानंतर 'महाराष्ट्राचा चिमुकला तानसेन' title=

मुंबई : श्रीगोंदा येथील घनश्याम दरोडे या राजकीय धुरंधर यूट्यूब, फेसबूक आणि व्हॉ़टसअॅप धुमाकूळ घातल असताना आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा आहे महाराष्ट्रातील एका छोट्या तानसेनाचा.... 

हा तानसेन ' आई बापाची माया' हे गाणे म्हणतो आहे. (गाण्याचा व्हिडिओ खाली आहे)

महाराष्ट्रात अनेक रत्नांची खाण आहे. पण त्या रत्नांना रत्नपारखी मिळत नाही. पण या नव्या सोशल मीडियामुळे त्यांना एक व्यासपीठ मिळालं आहे. या छोट्या तानसेनची कला दर्शविणारा हा व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओ २०११ मध्ये पोस्ट करण्यात आला होता. पण राजकीय धुरंधरानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. (गाण्याचा व्हिडिओ खाली आहे)

 

आता हा चिमुकला तानसेन थोडा मोठा झाला असेल तो कुठे आहे काय करतो, हे माहित नाही. पण हा हिरा शोधून काढला तर त्याला पैलू पाडण्यात मदत होईल. 

अशी दक्षिण भारतात लता मंगेशकरांचे गाणे म्हणणारी गानसम्राज्ञी होती, तीला झी मीडियाने शोधून देशासमोर आणले होते. तुम्हांला जर या तानसेनाबद्दल माहीत असेल तर आम्हांला #चिमुकलातानसेन हॅशटॅग करून @zee24taasnews ला मेन्शन करा. तसेच zee24taasonline@gmail.com वर त्याची माहिती, फोन क्रमांक पाठवा. आम्ही त्याची काहणी आणू जगा समोर... हे आमचं आश्वासन आहे... 

पाहा हा छोटा 'तानसेन'