नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या गोरखपूरमधील गोरक्षपीठाचे नेपाळ सोबत जुने संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे गोरखपूरमधील त्यांचा मठ हा भारत नेपाळ सीमेवर आहे. तसेच तेथील मंदिरे आणि राजघराण्यांसोबत त्यांचे जुने संबंध आहेत.
नेपाळमधील पूर्व राजघराणं हे गोरखा समुदयासोबत जोडले गेले आहे. गोरखा हे स्वतःला गुरू गोरखनाथांचे वंशज मानतात. गोरखपूरचे गोरक्षपीठ नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार चालते आणि नेपाळचे राजा बीरेंद्र या परंपरेचे प्रतिक मानले जातात.
त्याचप्रमाणे राजा बीरेंद्र हे योगी आदित्यनाथ यांचे गुरू अवैद्यनाथ यांना आपले गुरू मानत होते. १९९२मध्ये ते गोरक्षपीठमध्ये त्यांना भेटण्यासाठी आले होते.