मुंबई : वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी आज चक्क मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास केला. त्यांची ही पहिलीच मुंबई भेट.
या भेटीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रवासी वाहून नेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई लोकलमधून प्रवासाचा मोह क्रिस्टालिना यांना आवरला नाही, त्यामुळे मग त्यांनी चर्चगेट ते दादर असा प्रवास केला.
या प्रवासात त्यांनी महिला प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर क्रिस्टालिना यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याशीही चर्चा केली.