'महिलांनी राजकारणात येताना विचार करावा...इथे राक्षस आहेत!'

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

Updated: Jan 15, 2014, 08:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, अतिशय वाईट वागणूक मला दिली जात आहे, असं शीतल म्हात्रे यांनी झी मीडियाशी बोलतांना म्हटलं आहे.
सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिलांना राजकारणात येतांना विचार करावा, इथे राक्षस आहेत!, असा सल्लाही शीतल म्हात्रे यांनी दिला आहे. आपल्या आजारपणाला शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकरच जबाबदार आहेत. शिवसेनेत दुफळी माजू नये म्हणून आपण वेळोवेळी हे सहन केलं, मात्र आता ते असह्य झालं आहे.
मुंबईसाठी आपण काहीतरी करू हे स्वप्न ठेऊन आपण नगरसेवक झालो होतो. मात्र आता ते शक्य होत नसल्याचं दिसतंय, म्हणून मी आपल्या पदाची राजीनामा देते आहे.
आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्व गाऱ्हाणी मांडायची होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भेटच दिली नसल्याचंही शीतल म्हात्रे यांनी झी मीडियाशी बोलतांना सांगितलं.
उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांच्यावर आपलं शिवसेनेएवढंच प्रेम आहे. मी कधीही शिवसेना सोडणार नाही, मी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला तरी शिवसेनेसोबत राहिनं असंही शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे.

मला होत असलेल्या त्रासामुळे आधी माझी मानसिक स्थिती बिघडली, आता माझी शारिरिक स्थिती बिघडली आहे, यामुळे आपण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचंही शीतल म्हात्रे यांनी म्हटलंय.

पाहा... काय म्हणाल्या शीतल म्हात्रे... त्यांच्याच तोंडून...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.