महिला पत्रकाराची रेल्वे स्टेशनवर छेडछाड

एका महिला टीव्ही पत्रकाराची छेड काढण्याची घटना परळ स्टेशनला घडली आहे. सोमवारी ही महिला रिपोर्टर सव्वा आठ वाजता घरी परतत असताना, एक तरूण तिच्याजवळ आला आणि असभ्य वर्तन करू लागला, तिने विरोध केला, त्याला पकडलं, आरडाओरड केला पण कुणीही मदतीला आलं नाही. तरीही या महिला रिपोर्टरने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून जाण्यास यशस्वी ठरला.

Updated: Dec 24, 2015, 11:34 AM IST
महिला पत्रकाराची रेल्वे स्टेशनवर छेडछाड title=

मुंबई : एका महिला टीव्ही पत्रकाराची छेड काढण्याची घटना परळ स्टेशनला घडली आहे. सोमवारी ही महिला रिपोर्टर सव्वा आठ वाजता घरी परतत असताना, एक तरूण तिच्याजवळ आला आणि असभ्य वर्तन करू लागला, तिने विरोध केला, त्याला पकडलं, आरडाओरड केला पण कुणीही मदतीला आलं नाही. तरीही या महिला रिपोर्टरने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून जाण्यास यशस्वी ठरला.

रेल्वे पोलीस खरंच काम करतायत का ? आरपीएफ आणि जीआरपीचे पोलीस जर स्टेशनवर त्या दिवशी असते तर हा तरुण त्यावेळीच पकडला गेला असता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्टेशनवर या वेळेत रेल्वे पोलीस उपस्थितही नव्हता. या पत्रकाराने यावेळी जीआरपी कमिश्नर मधुकर पांडे यांना फोनही केला. पण त्यांनी फोन न घेतल्याने ती तशीच घरी परतली.