खगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून!

आज नारळी पौर्णिमा... रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाच्या शुभ दिनी खगोल प्रेमींसाठीही एक गुडन्यूज आहे... आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतोय.. 

Updated: Aug 10, 2014, 09:44 AM IST
खगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून! title=

मुंबई: आज नारळी पौर्णिमा... रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाच्या शुभ दिनी खगोल प्रेमींसाठीही एक गुडन्यूज आहे... आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतोय.. 

चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आज चंद्र आणि पृथ्वीतला दुरावा थोडासा कमी होणार आहे. म्हणजे तो पृथ्वीपासून 3 लाख 57 हजार किलोमिटर अंतरावर येणार आहे. अर्थात आज जर आकाश निरभ्र राहीलं तर तो 14 टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक तेजस्वी दिसणार आहे. 

मुंबईत संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी चंद्रोदय आहे त्यामुळे जर आकाश निरभ्र राहिलं तर मुंबईकरांना सुपर मूनचा आनंद नक्कीच घेता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.