ज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस

 येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.   

Updated: Jun 18, 2016, 02:28 PM IST
ज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस  title=

मुंबई  :  येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.   

शनी आणि मंगळाची युती तुटल्यावर काय होते...

ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि मंगळाची युती तुटल्यानंतर त्याचा परिणाम पृथ्वीवर होतो. त्यामुळे वादळ, पूर, अपघात, अतिवृष्टी होण्याची शक्यता असते.  

बळीराजाला पावसाची प्रतिक्षा...

राज्यातील बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात नेमका पाऊस कधी पडणार हा त्याच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या या भाकीतामुळे बळीराजाला फायदा होणार आहे. 

असा अंदाज बांधणे चुकीचे...

दरम्यान, मंगळ आणि शनी युतीचा आणि पावसाचा काही संबंध नाही.  असा परिणाम व्हायचा असता तर संपूर्ण जगावर याचा  परिणाम झाला असता. पावसाचा अंदाज करायचा झाला तर हवामान शास्त्राचा अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्या वेधशाळा अधिक आधुनिक होण्याची गरज आहे, असे खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी सांगितले.