...जेव्हा गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांना फोन लावतात!

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी भाजपचा कणा म्हणून काम पाहणाऱ्या प्रमोद महाजनांना फोन लावला... ही घटना घडली होती ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’च्या सेटवर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 12, 2014, 07:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी भाजपचा कणा म्हणून काम पाहणाऱ्या प्रमोद महाजनांना फोन लावला... ही घटना घडली होती ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’च्या सेटवर...
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्यावर आज पैठणमध्ये दशक्रिया विधी पार पडली. त्यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून गोपीनाथ मुंडेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर फिरताना दिसतोय... यावेळी प्रमोदजींची आठवण काढत मुंडे अतिशय भावूक झालेले लोकांनी पाहिले होते.

गायक संगीतकार अवधूत गुप्ते होस्ट करत असणारा आणि विशेष गाजलेला कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’च्या सेटवर गोपीनाथ मुंडे यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी, एका प्रसंगी अवधूतनं गोपीनाथ मुंडेंना, एखाद्या व्यक्तीला फोन करायचाय ज्याला तुम्हाला काही तरी सांगायचंय पण आत्तापर्यंत ती संधी मिळाली नाही... असं म्हटल्यावर मुंडेंनी फोन फिरवला तो त्यांच्या अत्यंत जवळच्या पण त्यांचा हात अर्ध्यावर सोडून गेलेल्या मित्राला... प्रमोद महाजन यांना...
यावेळी मुंडे यांनी प्रमोद महाजन यांच्याशी आपला अबोला झाला... त्यावेळी काय घडलं याचीही आठवण सांगितली होती.

गोपीनाथ मुंडे यांचा हाच तो अविस्मरणीय व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.