काय म्हणाले राज?

राज ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले. राज ठाकरेंनी मनसैनिकांना अभिवादन करून आपल्या घणाघाती भाषणाला सुरूवात केली आहे. हजारो मनसैनिकांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 21, 2012, 04:25 PM IST

राज ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले. राज ठाकरेंनी मनसैनिकांना अभिवादन करून आपल्या घणाघाती भाषणाला सुरूवात केली आहे. हजारो
मनसैनिकांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती.

काय म्हणाले राज?
-मोर्चाला शांततेनं पण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल हजारो मनसैनिकांचे राज ठाकरेंनी मानले आभार
-ज्या ज्या वेळी अशा घटना घडतील त्या त्या वेळेस असाच पाठिंबा द्या - राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन
-मला फक्त महाराष्ट्र धर्म समजतो | पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही - राज
-पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही - राज ठाकरे
-कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... कुठे गेले आत रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर?
-आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही | आमचं टार्गेट 'अरुप पटनायक'
-लोकशाही मार्गानंही मोर्चा काढायचा नाही का?... आर. आर. पाटलांनी मध्येच घातलं शेपूट
-वाकड्या चेहऱ्यानं बघण्याची हिंमत होऊ नये | प्रत्येकवेळी अशीच ताकद दाखवा
- मनसेच्या मोर्चाला अडथळे आणण्याचे प्रयत्न. अडथळे आणण्यात अरुप पटनायक यांचा हात

अबू आझमींनी केली भडकाऊ भाषणं | राज्याच्या बाहेरच्यांनी घडवला हिंसाचार
अबू आझमी निवडून येतो... कारण त्याला निवडून देणारे सगळे राज्याच्या बाहेरून आलेले लोक आहेत